‘Anubhooti’: पणजेंत मंत्र आनी आधुनिक संगीताचो अद्भूत संगम; १७ जुलै दिसा सुवाळो
‘अनुभूती’: पणजीत रंगणार मंत्र आणि आधुनिक संगीताचा अभूतपूर्व संगम; १७ जुलै रोजी आयोजन
पणजी (Panaji): कला रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी आणि एक आगळावेगळा आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी ‘अनुभूती’ या नाविन्यपूर्ण लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्सचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १७ जुलै रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, पणजी-गोवा येथील कला अकादमीच्या ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर’ येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
गोंयच्या संगीत मोग्यांक एक वेगळोच आनी आत्मिक अणभव दिवपा खातीर ‘अनुभूती’ (Anubhooti) ह्या आगळ्या-वेगळ्या लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्साचें आयोजन सुक्रारा, १७ जुलै दिसा सांजवेळा ६:०० वरांचेर, कला अकादमीच्या ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर’ हांगा जातलो.
‘अनंतस्य फाउंडेशन’ (Anantasya Foundation) आणि ‘इथरनेट एक्सप्रेस फाउंडेशन’ (Ethernet Xpress Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ‘राष्ट्र टीव्ही’ (Rashtra TV) हे या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत.
संगीताचा एक अनोखा प्रवास / संगीताचो एक अनोखो प्रवास:
‘द हार्ट ऑफ अ जोगन बँड’ (The Heart of a Jogan band) द्वारे सादर केली जाणारी ही मैफल पारंपारिक मैफिलींच्या पलीकडे जाणारी असेल. यामध्ये प्राचीन मंत्रांमधील स्पंदने आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक, अॅम्बियंट व वर्ल्ड म्युझिकचा (World Music) यांचा अप्रतिम मेळ पाहायला मिळेल.
हो कार्यक्रम पारंपारिक संगीताच्या चौकटी भायर वचून, आमी पळयतात त्या साद्या मैफिलीं परस सामको वेगळो आसतलो. हातूंत पोरण्या मंत्रांचीं स्पंदनां (vibrations) आनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक, अॅम्बियंट आनी वर्ल्ड म्युझिक हांचो सुंदर मेळ पळोवपाक मेळटलो. ‘अनुभूती’ म्हळ्यार थेट अणभव वा आध्यात्मिक जाणविकाय (Direct Realization).
दिग्गज कलाकारांची मांदियाळी / कलकारांची व्हड पंगड:
या संगीतमय प्रवासाचे मुख्य नेतृत्व गायिका तन्वी वालावलकर (Tanvi Walawalkar) करणार आहेत. त्यांच्या सोबतीला प्रतिभावान वादक, इलेक्ट्रॉनिक संगीतकार आणि शास्त्रीय गायकांचा चमू असेल.
ह्या संगीतमय प्रवासाचें फुडारपण मुख्य गायिका तन्वी वालावलकर करतली. तिच्या सांगाताक अद्भूत तांक आशिल्ले वाद्कार आनी शास्त्रीय गायक आसात:
- ओंकार चारी (Omkar Chari) – Lead Vocalist
- विष्णू शिरोडकर (Vishnu Shirodkar) – Keyboard & Arrangement
- प्रथमेश चारी (Prathamesh Chari) – Drummer
- सोनीक वेलिंगकर (Sonik Velingkar) – Flute / बासरी
- सुरजीत थळी (Surjeet Thali) – Tabla & Pakhwaj
- रोहन नाईक (Rohan Naik) – Electric Guitar
- फ्रोबेल रेबेलो (Froebel Rebello) – Bass Guitar
- श्रीद वालावलकर (Shreed Walawalkar) – Taal / ताळ
- गायिका / Singers: सोनाली रिवणकर (Sonali Rivoncar), अनुज्ञा पै वेर्णेकर (Anudnya Pai Vernekar), निधी भट (Nidhi Bhat), राजेश्वरी नायर (Rajeshri Nair), त्रयी वालावलकर (Trayee Walawalkar), विद्या शिरोडकर (Vidhya Shirodkar), वरदा शिरोडकर (Varada Shirodkar)
- वेदांत शिरोडकर (Vedant Shirodkar) – Shankh / शंख
- प्रियंका राव (Priyanka Row) – Compere / सूत्रसंचालन
आयोजकांचा उद्देश / संस्थेचो उद्देश:
‘अनंतस्य फाउंडेशन’ संगीत, कला, योग, संस्कृती, प्राचीन ज्ञान आणि इतिहास यांच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. तर, ‘इथरनेट एक्सप्रेस फाउंडेशन’ ही इथरनेट एक्सप्रेसची सामाजिक बांधिलकी (CSR) शाखा असून, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ती कटिबद्ध आहे.
‘अनंतस्य फाउंडेशन’ संगीत, कला, योग, संस्कृती, पोरणें ज्ञान आनी इतिहास हांचे उदरगती खातीर वावरता. जाल्यार, ‘इथरनेट एक्सप्रेस फाउंडेशन’ ही इथरनेट एक्सप्रेसची समाजीक बांदिलकी (CSR) शाखा आसून, समाजांत बरो बदल हाडपाच्या उद्देशान काम करता.
तिकीट आणि प्रवेश / तिकीट आनी प्रवेश:
- ऑनलाईन तिकीट (Online Tickets): tickets99.com
- तिकीट दर (Ticket Price): Rs. 300 & Rs. 500
- वेळ (Timing): रसिकांना १७ जुलै रोजी संध्याकाळी ५:४५ पूर्वी आपले स्थान ग्रहण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संगीत मोग्यांनी १७ जुलै दिसा सांजवेळा ५:४५ वरांचेर पयलीं दीनानाथ मंगेशकर कला मंदिरांत आपली सुवात घेवची अशी विनंती केल्या.



