गोवा

व्हिलेज पंचायत कंडोलिमच्या पुढाकाराने वृक्षारोपण, सरपंच ब्लेझ फर्नांडिस यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग

गोव्यात सध्या वनमहोत्सव उत्साहात साजरा केला जात असून विविध भागांमध्ये वृक्षारोपणाचे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हिलेज पंचायत कंडोलिम यांच्या वतीने बीच परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला कंडोलिमचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, पंचायत सदस्य श्री लॉरेन्को एक्स सिल्व्हेरिया, श्री जोआओ लुईस मिंगुएल रॉड्रिग्ज, श्री. लॅनी फिआल्हो, श्री दिनेश गुरुदास मोरजकर, श्री. साल्वाडोर ब्लेझ फर्नांडिस (सरपंच), Smt Purificacao Sandra Fialho, मारिया पर्पेटुआ फर्नांडिस, श्री लॉरेन्को अमानसिओ फर्नांडिस, श्रीमती निधी नामदेव परब, श्रीमती अमलिना डायस उपसरपंच यांच्यासह, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Digital Goa Varta

बीच परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. समुद्रकिनारी हरित पट्टा वाढविण्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. गोवा बायोडाव्हर्सिटी बोर्डचे मिशेल फर्नांडिस यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले. याशिवाय मिशेल फर्नांडिस यांनी या प्रकल्पाचे कौतूक केले. बोर्डकडून सर्वोतोपरी सहकार करू जेणेकरुन बीच आणि जैवविविधता टिकून राहिल असे म्हटले.

गोवा हे आपल्या निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि घनदाट हरित संपदेसाठी ओळखले जाते. राज्यातील जंगलं आणि झाडे केवळ पर्यावरणाचा समतोल राखत नाहीत, तर पर्यटन उद्योगालाही मोठा आधार देतात. झाडांमुळे हवेची गुणवत्ता सुधारते, मृदा धूप रोखली जाते आणि जैवविविधतेचे संरक्षण होते. विशेषतः किनारी भागात झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. ती वादळे, समुद्राच्या लाटा आणि किनारी धूप यांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात. वाढत्या शहरीकरणामुळे हरित क्षेत्रांवर दबाव वाढत असताना अशा वृक्षारोपण मोहिमा पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक ठरत आहेत.

वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास गोव्याची हरित ओळख अधिक मजबूत होईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Back to top button