गोवाडिजिटल गोवा वार्ता

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी वकिकुळण आणि शिगाव येथे तीव्र बैठक; मोठ्या आंदोलनाची तयारी!

धारबांदोडा:

धारबांदोडा तालुक्यातील वकिकुळण व शिगाव (१ली) या गावांमध्ये दिनांक २५ जुलै २०२६ रोजी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण व विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळ (धारबांदोडा शाखा)’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “गाव-गाव चलो अभियान” अंतर्गत ही बैठक पार पडली.

Digital Goa Varta

या बैठकीला धनगर समाजातील नागरिकांचा उस्फूर्त व प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची या बैठकीस लक्षणीय उपस्थिती होती.

“कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाचे ST आरक्षण झालेच पाहिजे!” अशा एकमुखी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या या मागणीबाबत समाजातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत असून लोक आता आक्रमक भूमिकेत आले आहेत.

‘एकच मिशन – धनगर ST आरक्षण’ हा नारा देऊन उपस्थितांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी तीव्र लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. शासन स्तरावर मागणी मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याची पूर्ण तयारी धनगर समाजाने केली असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Back to top button