नगरपालिकांच्या नवीन प्रभागांची रचना आता लोकसंख्येच्या आधारावर; गोवा राज्य निवडणूक आयोगाचा पुढील आठवड्यात निर्णय शक्य

पणजी:
गोवा राज्य निवडणूक आयोग (SEC) राज्यातील ११ नगरपालिकांसाठी नवीन प्रभागांची (Wards) अंतिम रचना पुढील आठवड्यात जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. विशेष आणि महत्त्वाची बाब म्हणजे, यापुढे नवीन प्रभागांची निश्चिती ही नगरपालिका क्षेत्रातील ‘मतदारांच्या संख्येवर’ (Number of electorates) न करता, त्या भागातील ‘एकूण लोकसंख्येच्या’ (Population) आधारावर केली जाणार आहे.
यापूर्वी, राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची निर्मिती ही केवळ नोंदणीकृत मतदारांच्या संख्येच्या आधारे केली जात होती. मात्र, आता या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, सर्वंकष प्रतिनिधित्वासाठी नव्या प्रभाग रचनेत एकूण लोकसंख्येला प्राधान्य दिले जाणार आहे.
पुढील आठवड्यात या नव्या प्रभाग रचनेवर अंतिम मोहोर लागण्याची शक्यता असल्याने, या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.



